प्रधानमंत्री आवास योजना
अमरावती महानगरपालिका, अमरावती



अर्ज करण्याची पद्धत

महत्वाची टीप :

अर्ज सर्व सेतू केंद्र, संगणक केंद्रावरुन सुद्धा भरता येईल. त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त रु.१००(शंभर) आकारणी करण्यात येऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत यापेक्षा जास्त शुल्क आकारु अथवा देऊ नये.

सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्या जातील त्याकरिता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे डाऊनलोड केलेले अर्ज व नमुने व्यवस्तीत भरून स्कॅन करावे . डाऊनलोड करून भरलेल्या अर्जासाहित सर्व जोडलेली कागदपत्रांची एकच स्कॅन PDF फाइल बनवून घ्यावी. कागदपत्राच्या स्कॅन PDF फाइल ची साईज ४MB पेक्षा जास्त नसावी.

स्कॅन साठी कागदपत्रांची मूळ प्रतच वापरावी आणि एका पानावर एक पेक्षा जास्त कागदपत्र घेऊ नये.

सर्व कागदपत्रे स्कॅनर मधूनच स्कॅन करावे.स्कॅन साठी इतर उपकरणे (मोबाईल,टॅब,कॅमेरा इत्यादी चा वापर केल्यास अर्ज नाकारण्यात येईल ) वापरू नये.

अर्ज कसा भरावा

1. सर्वप्रथम संकेत स्थळावरून मराठी अर्ज व नमुने डाऊनलोड करून घ्यावे.

2. डाऊनलोड केलेले अर्ज व नमुने व्यवस्तीत भरून घेतले आहे याची खात्री करून घ्यावी.

3. उत्पनाच्या दाखल्याचा नमुना डाऊनलोड करून व्यवस्तीत भरून स्वसाक्षांकित करणे आवश्यक आहे.

3. उत्पनाच्या दाखल्याचा नमुना डाऊनलोड करून व्यवस्तीत भरून स्वसाक्षांकित करणे आवश्यक आहे.

4. अर्जासोबत सादरकरावयाचे प्रतिज्ञापत्र हे रु. १००(शंभर) च्या मुद्रांकावर असणे अपेक्षित आहे, रु. १०० चा मुद्रांक उपलब्ध नसल्यास कोऱ्याकागदावर सुद्धा चालेल व त्यासाठी लागणारा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे लाभ मिळतेवेळी रु. १०० च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.

5. सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्या जातील त्याकरिता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे आणि भरलेल्या अर्जासाहित सर्व जोडलेली कागदपत्रांची एकच स्कॅन PDF फाइल बनवून घ्यावी. कागदपत्राच्या स्कॅन PDF फाइल ची साईज ४MB पेक्षा जास्त नसावी आणि कागदपत्रे खालील अनुक्रमात असणे आवश्यक आहे.

कागदपत्राचा अनुक्रम

आवश्यक कागदपत्रे :

A) उत्पन्नाचा दाखला (स्वतः प्रमाणित केलेले)

B) अर्जासोबत सादरकरावयाचे प्रतिज्ञापत्र हे रु. १००(शंभर) च्या मुद्रांकावर असणे अपेक्षित आहे, रु. १०० चा मुद्रांक उपलब्ध नसल्यास कोऱ्याकागदावर सुद्धा चालेल व त्यासाठी लागणारा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे लाभ मिळतेवेळी रु. १०० च्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.

C) आधार कार्ड

D) बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत (IFSC कोड असलेला)

E) मतदार ओळखपत्र

गरज भासल्यास लागणारे कागदपत्रे :

F) BPL प्रमाणपत्र

G) जातीचा दाखला (SDO/तहसीलदार)

H) जात पडताळणीचे प्रमाणपत्र

I) PAN कार्ड

J) राशन कार्ड

K) विधवा असल्याचे पुरावे

L) TAX पावती

M) घटस्फोटित/पारितकत्या असल्याचे पुरावे

N) अपंगत्वाचे प्रमाणपत्र

O) भूखंडाचा ६/२ दाखला

P) सिटी सर्वेचे मिळकत प्रमाणपत्र

Q) इतर (विद्युत देयक, पाणीपुरवठा बिल, टेलीफोन बिल, इत्यादी)

6. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि स्वतःचा अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो (.JPEG/.JPG) स्वतः जवळ असण्याची खात्री करावी. अर्ज भरते वेळी आपल्याला स्वतःचा फोटो अपलोड करावा लागेल, आणि या सोबतच कागदपत्रे जास्तीत जास्त २०० dpi PDF फाइल मध्येच स्कॅन करावी. स्कॅन PDF फाइल अपलोड करावी लागेल.तसेच स्कॅन केलेल्या PDF फाइल ची size 4 MB पेक्षा जास्त नसावी. सर्व कागदपत्रांची एकच PDF फाइल बनवावी.

1. फोटो उदा. 220 x 200 (साईज जास्तीत जास्त 75 KB )
2. स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा उदा. साधारणताः 200 x 200 (साईज जास्तीत जास्त 75 KB)

7. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी "नवीन अर्ज" या बटन वर क्लिक करावे.

8. नंतर आपली वैयाक्तिक माहिती, इतर आवश्यक माहिती,फोटो आणि कागदपत्रांची स्कॅन PDF अपलोड करून अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे त्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही.

9. माहिती भरल्यानंतर अर्जाची पोच पावती प्रिंट काढून आपल्या माहिती साठी व भविष्यातील गरजेसाठी जतन करून ठेवावी.

10. तुमची अर्ज प्रक्रिया येथे पूर्ण होते. अर्जदाराने नियमितपणे वेबसाइट चेक करावी.