महत्वाची टीप :
अर्ज सर्व सेतू केंद्र, संगणक केंद्रावरुन सुद्धा भरता येईल. त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रियेसाठी जास्तीत जास्त रु.१००(शंभर) आकारणी करण्यात येऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत यापेक्षा जास्त शुल्क आकारु अथवा देऊ नये.
स्कॅन प्रक्रिया :
1. सर्व प्रथम भरलेला अर्ज संबंधित कागद पत्रांसह (Original Document / कागद पत्रांची मूळप्रत) स्कॅनर मधुनच स्कॅन करावा.
(मोबाईल, टॅब, कॅमेरा इत्यादी चा वापर केल्यास अर्ज नाकारण्यात येईल)
2. मराठी अर्ज व संबंधित प्रतिज्ञा पत्रे या मध्ये काही बदल झाला आहे का हे वेळोवेळी तपासुन पाहावे. बदल आढळल्यास अर्ज व प्रतिज्ञापत्रे नवीनच वापरावी.
3. स्कॅनर मधून स्कॅन करताना सर्व कागदपत्रांचा अनुक्रम व्यवस्तीत लावावा लाभार्त्याने भरलेला अर्ज सूद्धा स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
4. अर्ज व सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग हे जास्तीत जास्त २०० dpi मधेच करावे, २०० dpi पेक्षा जास्त मधे करू नये. स्कॅन केलेला अर्ज संबंधित कागदपत्रे मिळून pdf जास्तीत जास्त ४ MB पर्यंत असावी.
5. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि स्वतःचा अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो (.JPEG/.JPG) स्वतः जवळ असण्याची खात्री करावी. अर्ज भरते वेळी आपल्याला स्वतःचा फोटो अपलोड करावा लागेल, आणि या सोबतच कागदपत्रे जास्तीत जास्त २०० dpi PDF फाइल मध्येच स्कॅन करावी. स्कॅन PDF फाइल अपलोड करावी लागेल.तसेच स्कॅन केलेल्या PDF फाइल ची size 4 MB पेक्षा जास्त नसावी. सर्व कागदपत्रांची एकच PDF फाइल बनवावी.
6. सदर अर्ज व संबंधित कागदपत्रांचा एकून साईज हि जवळपास ४ MB ची असल्यामुळे कागदपत्रे Upload होण्यासाठी २ ते ३ मिनिटे लागू शकतात व ते संबंधित सेतू अथवा संगणक केंद्रातील Internet Speed वर अवलंबून आहे. हे लक्षात घेऊन एकदा Save या बटन वर Click केल्यावर संयम बाळगुन कागदपत्रे Upload होईपर्यंत २ ते ३ मिनिट वाट पाहावी.
7. संबंधित कागदपत्रे Upload झाल्यावर प्रत्येक वेळेस अर्ज प्राप्त झाल्याची पोच पावतीची PDF मिळालेली Save करून लाभार्थ्यास भविष्यातील संधर्भासाठी प्रिंट करून दयावी.